पतीने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून केली बदनामी पत्नीने केली आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन 

सोशल मिडियाच्या अतिरिक्त आणि त्याचा नको तसा वापर केल्याने एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागला आहे. चक्क पतीने फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडून त्यावर पुरुषांशी चॅटिंग केले. या छळाला व बदनामीला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

[amazon_link asins=’B079GM7P92,B07FP3QP8W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf263d2a-b0ba-11e8-a5a0-8b8bf0817a0d’]

नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील ज्ञानेश्वरनगर येथे हा प्रकार घडला आहे. विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी  पतीसह सासूवर गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे.

मनीषा कवडे असे मृताचे नाव आहे.  काही दिवसांपूर्वी तिला अचानक फोन आणि मेसेज येऊ लागले. त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत पती प्रशांत आणि सासू भारती कवडे यांनी तिचा शारीरीक व मानसिक छळ सुरु केला.

तिच्या बँक खात्यातून २८ हजार रुपये काढून घेतले. रो-हाऊस घेण्यासाठी १० लाखांची मागणी केली. पतीने तिचे बोगस फेसबुक खाते उघडत अनोळखी पुरुषांशी चॅटिंग केली. या जाचाला कंटाळून तिने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. त्याची दखल घेत इंदिरानगर पोलिसांनी चौकशीअंती  पतीसह सासूवर गुन्हा दाखल केला. पतीला पोलिसांनी अटक केली आहे.