कर्जाच्या ताणतणावाला कंटाळून महिलेची आत्महत्या

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाईन – २ ते ३ बँकांमधून घेतलेल्या कर्जामुळे आलेल्या तणावामुळे एका ३२ वर्षीय महिलेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

संगिता प्रदिप दुबे (वय ३२) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संगिता दुबे या नालासोपारा पुर्वेकडील शिर्डी नगर येथील महावीर नगर इमारतीमध्ये राहात होती. या महिलेने २ ते ३ बँकांमधून खासगी कर्ज घेतले होते. त्यामुळे तिला त्याचा ताण आला होता. तिने सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास राहत्या घरात सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Loading...
You might also like