दुर्दैवी ! पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पत्नीची 9 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागत आहे. अनेकांचे हसतं-खेळत कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना मध्यप्रदेशातील इंदौरमधून समोर आली आहे. पतीचे कोरोनामुळे निधन झाल्याने पत्नीने इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे चौकशीनंतर समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान गुजरातमधील द्वारका शहरातही नुकतीच अशीच एक घटना घडली. शहरातील रहिवासी जयेशभाई जैन (60) यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे शुक्रवारी (दि. 8) त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्नी आणि दोन्ही मुलांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. पत्नी साधनाबेन जैन (57) आणि कमलेश (35) आणि दुर्गेश (27) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे कोरोनाने निधन झाल्याने तिघांनाही धक्का बसला होता. त्या तणावातच तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.