पतीनं लावले पत्नीच्या बेडरूममध्ये ‘कॅमेरे’, जाब विचारल्यावर सांगितलं ‘असं’ काही सर्वजण ‘हैरान-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – त्रिपुरामध्ये एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील साधुतिल्ला गावातील  एका व्यक्तीने आपल्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला. यानंतर आता पत्नीने या प्रकरणी महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पतीने आपल्या संरक्षणार्थ म्हटले कि, आत्मरक्षेसाठी मी हे कॅमेरे लावले आहेत. त्यानंतर आता हे पती-पत्नी वेगवेगळे राहत आहेत.

४७ वर्षाच्या चंदन कांति धर याची तीन वर्षांपूर्वी ३८ वर्षीय रत्ना पोद्दार हिच्याशी विवाह झाला. मात्र लग्नानंतर तिचा हुंड्यासाठी छळ सुरु झाला. लग्नामध्ये त्यांनी हुंड्याची मागणी केली नव्हती मात्र लग्नानंतर सासू सासऱ्यांनी हुंड्यासाठी छळ सुरु केला. सासू, सासरे आणि दीर यांनी हुंड्यासाठी मोठ्या प्रमाणात छळ केला. त्यानंतर महिलेच्या वडिलांनी जमीन विकून २ लाख रुपये दिले मात्र तरीदेखील तिचा छळ चालूच राहिला. मात्र हे सगळे सुरु असताना आपले पतीचे नातेवाईक महिलेची विवाहबाह्य संबंध असल्याचे तिच्या निदर्शनास आले त्यानंतर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला तिच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे आढळून आल्यानंतर ती चिडली. त्याचबरोबर संपूर्ण घरात देखील त्याने कॅमेरे लावले होते. या प्रकरणानंतर महिलेने महिला आयोगात धाव घेत या प्रकरणाची तक्रार नोंदवली. त्याचप्रमाणे २ जुलै रोजी घरगुती हिंसा, हुंडा मागणे आणि शारीरिक छळ यांसारख्या गुन्ह्यांत तक्रार नोंदवली. त्यानंतर आरोपी पतीने या सर्व गोष्टी नाकारत आपण निर्दोष असल्याचे म्हटले.

दरम्यान, त्रिपुरा महिला आयोगाच्या अध्यक्षा बर्नाली गोस्वामी यांनी  हि दुर्मिळ घटना असल्याचे सांगत दोन्ही पक्षांना विचार करण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी दिला असून पत्नीला मासिक ३ हजार रुपये देण्याचे आदेश पतीला देण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like