पतीने दिला ‘धोका’ ; पत्नीने दिली ‘अशी’ शिक्षा

हुकूशी (तैवान) : वृत्तसंस्था – लग्नात पतीकडून फसवणूक झाल्याच्या रागातून पत्नीने पतिपासून घटस्फोट घेत विभक्त झाली. विभक्त झाल्यानंतर तिने पतीचा प्रायव्हेट भाग कात्रीने कापून अ‍ॅसिडमध्ये टाकून फ्लशमध्ये टाकला. हा धक्कादायक प्रकार तैवान येथील हुकूशी शहरात घडला. या घटनेनंतर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार २४ जुलै रोजी घडला आहे. ली (वय-५८) या महिले एक महिन्यापूर्वी तिचा पती चेन याच्यापासून विभक्त झाली आहे. चेन हा मागील दोन वर्षापासून बेकार आहे. विभक्त झाल्यानंतर देखील तो पत्नी ली सोबत रहात होता. काम न करता आपल्या पैशांवर तो इतर महिलांना भेट असल्याचा राग लीच्या मनामध्ये होता. याच रागातून तिने हे कृत्य केले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२४) रात्री साडे आठच्या सुमारास चेन याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. तसेच त्याला भिती होती की त्याची पत्नी ली त्याच्यावर आणखी हल्ला करू शकते. त्यामुळे त्याने स्वत: शौचालयात बंदी करून घेतले. पोलीस घटनास्थळी पोहचले त्यावेळी चेन याची पत्नी ली हिने गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली असून पोलिसांनी जप्त केली आहे. जखमी ली वर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.