महिलेची प्रसूती ; तिघांनी केला ‘बाळाचा बाप’ असल्याचा दावा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकाच नवजात बालकावर एक, दोन नाही तर तिघांनी दावा केल्याने कोलकातामधील रुग्णालय संभ्रमात पडलं. बाळाचा नेमका बाप कोण ? हा प्रश्न त्यांना पडला. कोलकात्यातील आयरिस हॉस्पिटलमध्ये या मुलाचा जन्म झाला. मुलाला जन्म दिल्यानंतर मुलाची आई बेशुद्ध झाली. त्यामुळे या मुलाचा बाप कोण असे कोडे या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना पडले. अखेर पोलिसांच्या मदतीने त्यांनी हे कोडे सोडवले.

या महिलेला शनिवारी प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिच्यासोबत तिची आई आणि एक पुरुष होता. त्यानंतर आणखी एक व्यक्ती दवाखाण्यात आली आणि हि महिला आपली पत्नी असल्याचा दावा त्याने केला. तिला भेटण्याची मागणी त्याने डॉक्टरांकडे केली. मात्र त्याआधीच एक व्यक्ती आपण त्या महिलेचा पती असल्याचे सांगून तो तिचा पती असल्याचे म्हणत प्रसूतीच्या फॉर्मवर स्वाक्षरीही केली असल्याचे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याने सांगितले. यानंतर त्या दोन व्यक्तींमध्ये हॉस्पिटलमध्येच मारामारी सुरु झाली. यानंतर परिस्थिती पाहून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. त्याचबरोबर महिलेच्या नातेवाईकांना खबरदारी म्हणून हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली.

त्या महिलेने मुलीला जन्म दिला. यानंतर पोलिसांनी या दोघांची चौकशी करताना त्यांना लग्नाचा पुरावा सादर करण्यास सांगितले. त्यावर दुसऱ्या व्यक्तीने लग्नाचे प्रमाणपत्र सादर केले तर पहिल्या व्यक्तीने आपण त्या महिलेचा मित्र असल्याचे म्हटले. परंतु तरीदेखील पोलिसांसमोरचा पेच सुटला नव्हता. त्याचबरोबर महिलेच्या आईने देखील प्रमाणपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीला आपला जावई मानण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर थेट महिलेच्या तोंडूनच सत्य परिस्थिती ऐकण्याचे पोलिसांनी ठरवले. मात्र महिला बेशुद्ध असल्याने पोलिसांनी वाट पाहण्याचे ठरवले. मात्र इतक्यात तिसऱ्या व्यक्तीने येऊन आपण त्या महिलेचा पती नसून ते मुलं मात्र आपले असल्याचा दावा केला.

दरम्यान, अखेर पोलिसांनी त्या महिलेचा जबाब नोंदवण्याचे ठरवले. त्यानंतर महिलेने आपल्या जबाबात दिलेल्या माहितीने पोलीस देखील चक्रावले. त्या महिलेने कोणताही वेळ न घालवता दुसरा व्यक्ती आपला पती असून त्याच्याबरोबर लग्न झाले असून त्याने पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर त्या व्यक्तीने सांगितले कि, एप्रिल महिन्यात आम्ही लग्न केले असून कुटुंबीयांनी हे लग्न स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर आम्ही वेगळे राहत होतो. मात्र पत्नीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसनंतर आपण बाप झाल्याचे कळाल्याचे त्याने सांगितले. महिलेच्या या जबाबानंतर शेवटी या नाट्यावर पडदा पडला आणि शेवटी या मुलीचा खरा बाप सर्वांना कळाला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like