‘गर्भवती’ महिलेला नेणाऱ्या रुग्णवाहिकेस सिंहांनी घेरलं, गाडीतच झाली ‘प्रसूती’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना लॉकडाऊनमुळे जंगली प्राणी बर्‍याच वेळा उघड्यावर फिरताना दिसले आहेत. गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यामध्ये एका गर्भवती महिलेला अनेक बब्बर सिंहांच्या मध्ये रुग्णवाहिकेत मुलाला जन्म द्यावा लागला. ही विस्मयकारक घटना गधदाच्या भाका गावची आहे. सिंहांना हटवल्यानंतर त्या महिलेला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे मुल व महिला या दोघांची प्रकृती चांगली आहे.

खरं तर, 20 मे रोजी रात्री 10.20 च्या सुमारास गधदाच्या भाका गावच्या अफसाना सबरीश रफिकला अचानक लेबर पेन सुरु झाला. ही महिला वेदनांनी ग्रस्त होती. कुटुंबाने तातडीने 108 ला कॉल केला आणि रुग्णवाहिका बोलविली. रूग्णवाहिका महिलेसह रूग्णालयाकडे निघताच गावापासून दूर गीर गधदा ते उनाच्या रस्त्यात 4 बब्बर सिंहांनी गाडीचा रस्ता अडवला.

या सिंहांचा हेतू पाहून असे वाटत होते की ते रुग्णवाहिकेच्या वाटेवर उभे होते. गाडीतून बाहेर उतरून या सिंहांना हटवण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही कारण ते त्यांच्या समूहात होते आणि रात्री उशीर झाला होता. त्यामुळे धोका अधिक होता, दरम्यान महिला वेदनांनी ग्रासलेली होती जिला लवकरात लवकर रुग्णालयात नेणे आवश्यक होते. काही काळानंतर, ईएमटी जगदीश मकवाना आणि पायलट भरत अहिर यांनी धैर्याने परिस्थिती हाताळली. या दोघांनी मिळून रुग्णवाहिकेतच प्रसूती केली आणि त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला.

विचित्र गोष्ट म्हणजे, या संपूर्ण घटनेदरम्यान सिंहांनी गाडीचा रस्ता थांबवला आणि तिथेच उभे राहिले. चार सिंह गाडीभोवती फिरत राहिले. 20 मिनिटांनंतर जेव्हा मुलगी जन्माला आली तेव्हा सिंहांनी मार्ग सोडला. त्यानंतर आई व बाळाला ताबडतोब गिर गधदाच्या रुग्णालयात दाखल केले गेले. महिला आणि तिचे बाळ दोन्हीही निरोगी आहेत.