डंपरच्या धडकेत महिला ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सातारा रोड वरील कात्रज भाजी मंडईत घडली आहे. अमृता सुर्यकांत रूपनवर (38, रा. वाघजाईनगर, कात्रज) असे अपघाती मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई हेमंत धायगुडे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रूपनवर मोपेडवरून चाल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. डंपर चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता पळून गेला. अधिक तपास सहायक फौजदार एस. एस. देशमुख तपास करित आहेत.

Visit : Policenama.com