डंपरच्या चाकाखाली चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू, शिक्रापूर येथील घटना

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्रापूर,ता-शिरुर येथील शिक्रापूर – चाकण रस्त्यावर दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या डंपरची(एम एच १२ क्यूजी ७८७०)धडक बसून झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला.

मृत पावलेल्या महिलेचे नाव अनिता दिलिप बोराटे(रा.देहू रस्ता,बोराटेवस्ती,मोशी,ता-हवेली) असे असून, अपघाताबाबत तुषार नारायण शिंगाडे (कोरेगाव भीमा) यांनी अज्ञात डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर डंपरचालक वाहन सोडून पळून गेला. सदर घटनेचा तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.

Visit : Policenama.com