पुणे : उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांनी व्यक्त केला संशय

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –चक्कर येऊन पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान आज (शुक्रवार) सकाळी आठच्या सुमारास पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. मयत महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी मारहाण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगत संशय व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणीही तक्रार केली नसल्याचे सांगितले. आशा भिमराव जोगदंड (वय-35 रा. वाघेरे कॉलनी नं.3, पिंपरीगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला ही 15 दिवसांपासून बेपत्ता होती. काही दिवसांपूर्वी ती परत आली होती. ती पतीजवळ न राहता भावासोबत रहात होती. शुक्रवारी (दि.6) तिच्यात आणि पतीमध्ये बैठक झाली. त्यानंतर ती आईकडे जाण्यासाठी निघाली असता तिला चक्कर आल्याने ती रिक्षाने आईकडे केली. आईने तिला घेऊन तक्रार करण्यासाठी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी पोलीस ठाण्यासमोर तिला चक्कर येऊन उल्टी झाली. त्यामुळे तिच्या आईने तिला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर वायसीएम पोलीस चौकीतमध्ये याची नोंद करण्यात आली होती. या घटनेची माहिती भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी नोंद करून घेतली होती. ही घटना पिंपरीत घडल्याने हा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/