धक्कादायक ! ‘सिझेरियन’ दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापसाचा ‘गोळा’, 3 दिवसानंतर मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादमधील गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला, यात प्रसुती दरम्यान महिलेल्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याने बाळांपणानंतर तीन दिवसातच महिलेचा मृत्यू झाला. एका वीस वर्षींय महिलेच्या सिझेरियन झाल्यानंतर कापसाचा गोळा पोटात राहिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकारानंतर संबंधित डॉक्टरांच्या विरोधात कारवाई करुन त्यांना निलंबित करण्यात आले.

पोस्टमार्टेममध्ये महिलेच्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याचा रिपोर्ट आला. यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांवर निष्काळीजीपणाचा केल्याचा आरोप केला. तनुश्री तुपे यांचे सिझेरियन झाल्यानंतर तीन दिवसानंतर त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांचे २८ जुलैला निधन झाले. या महिलेला मुलगा झाला होता.

या धक्कादायक प्रकारानंतर महिलेल्या नातेवाईकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पोलीस संबंधित डॉक्टरांवर कारवाई करणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like