जावयाच्या घरी उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिलेचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडमध्ये हत्तीच्या हल्ल्यात 60 वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी वृद्ध महिला आपल्या जावयासह ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातील कांटाबहाल गावात तिच्या घरी जात होती. ओडिशा राज्यातील सुंदरगड जिल्ह्यातील रहिवासी सियामणी बाई (वय 60) पति लुटीरस जशपूर येथील तपकारा वन रेंजच्या जबला गावात राहणाऱ्या आपल्या मुलीच्या घरी आली होती. बुधवारी सकाळी वृद्ध महिलेचा जावई जयनारायण साय ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातील कांटाबहाल गावी आपल्या सासूला सायकलवरून सोडविण्यासाठी जात होता.

ओडिशाच्या मुख्य रस्त्यावरील तपकारापासून दीड किलोमीटर अंतरावर कांदाडोंढाजवळ खोऱ्यात जयनारायण साय सायकलवरून उतरून पायी चालत होते. वृद्धा सियामणीबाई जरा पुढे चालत होती. दरम्यान, हत्ती रस्त्यावर आला. हत्तीला पाहून जयनारायणाने त्या वृद्ध महिलेला वाचवण्यासाठी हात खेचण्याचा प्रयत्न केला, परंतुु हत्तीने धावत जाऊन त्या वृद्ध महिलेला सोंडेत गुंडाळले आणि वृद्ध महिलेच्या डोक्याावर दाताने प्रहार केला. या अपघातात महिलेेेचाच जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्ताचा जावई जयनारायण हा वनविभागामध्ये अग्निशमन दलात कामगार आहे.

41 दिवसांत हत्तीमुळे पाच जणांचा मृत्यू
2021 च्या 41 दिवसांत जिल्ह्यात हत्तींनी 5 जणांचा जीव घेतला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 26 लोक ठार झाले. मागील वर्षी जिल्ह्यात तीन हत्तींचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर जिल्ह्यातील तपकरा वन क्षेत्र ओडिशामधून पलायन करणार्‍या हत्तींसाठी कायमचे स्थान बनले आहे. वनविभागाच्या म्हणण्यानुसार बुधवारीपर्यंत तापकारा रेंजमध्ये 16 हत्ती आहेत. या घटनानंतर नजर ठेवण्यासाठी आणि रहिवाशांना इशारा देण्यासाठी कोणतीही यंत्रणा विकसित केलेली नाही.