पतीच्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन

लाकडी दांडक्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याने रक्तस्राव होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील निवसर सडा येथे घडली. खून झालेल्या महिलेचे नाव सरिता गंगाराम धाडवे असे आहे. या पती- पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले असता रागाच्या भरात पतीने सरिताच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला. हा वार वर्मी लागल्याने सरिता जागीच कोसळली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1c0e459-cc43-11e8-bbef-8701184a9940′]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत सरिताच्या पतीचे गेल्या काही दिवसापासून मानसिक संतुलन बिघडले होते. यातूनच त्यांच्यात वाद झाला. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

[amazon_link asins=’B008QS9J6Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ebc6cf21-cc43-11e8-b9ba-71f83d5728b0′]

मानवंदना न देताच केले सैनिकाचे अंत्यसंस्कार

चंद्रपूर : सैन्यात असलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला. या जवानाला मानवंदना न देताच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप गावकरी आणि माजी सैनिकांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सैनिकाची रीतसर मानवंदना देऊन पश्चिम बंगाल येथून नागपूर एअरपोर्टला त्यांचे पार्थिव शरीर आणण्यात आले होते. नागपूर येथे मानवंदना देऊन रात्रीच त्यांचे पार्थिव चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील साखरा या गावांमध्ये आणण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रवीण बावणे यांना मानवंदना देण्यासाठी काही माजी सैनिक व घर वाल्यांनी आग्रह धरला परंतु वरिष्ठांकडून तसे आदेश नसल्याने मानवंदना देण्यात आली नाही असे कळले. सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन प्रवीण बावणे यांना योग्य न्याय मिळावा यासाठी माजी सैनिक व कुटुंब वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला नेले फरफटत