‘वर्क फ्रॉम होम’मुळे पती लक्ष देईना, पत्नीने शोधून काढली ‘भन्नाट’ आयडिया (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसच्या परिस्थिती अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. कामाच्या गडबडीत जोडीदाराकडे लक्ष द्यायलाही त्यांना पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अनेक घरात नवरा-बायकोमध्ये भांडणे होत आहेत. तुमच्या पतीने किंवा पत्नीने तुमच्या दुर्लक्ष केलं तर तुम्ही काय कराल ? साहजिकच भांडाल, रागवाल, रूसून बसाल. मात्र सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

@jmaybs

Quarantine life got me like 😂🤡 #fyp #funny #twerk #husband #wife

♬ original sound – corona barona

पतीचे दुर्लक्ष झाल्यानंतर त्याचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी पत्नीने भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. त्यासाठी एका टिकटॉक युझरने व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल. या जेव्हा पती काम करतो आणि तुम्ही काहीच करत नसता, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला चक्क जोकर झाल्याचे दिसून आले आहे. जोकर होऊन ती गाण्यावर डान्स करते आणि आपल्या पतीचे मनोरंजन करत, त्याचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे.