डोळ्याला ‘कलर’ करायला गेली मुलगी, ‘टॅटू’वाल्याच्या एका चुकीमुळं झाली ‘आंधळी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका मुलीने फॅशनसाठी टॅटू आर्टिस्टकडून आपले दोन्ही डोळे रंगविण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय तिच्या आयुष्यासाठी खूप धोकादायक सिद्ध झाला. ज्यामुळे मुलीच्या एका डोळ्याची दृष्टी गेली असून लवकरच ती दुसऱ्या डोळ्यानेही आंधळी होणार आहे. माहितीनुसार, अलेक्झांड्रा सडोवस्का (25) असे या मुलीचे नाव असून ती पोलंडमधील वरोक्लॉ येथील रहिवासी आहे. डोळे रंगवल्यानंतर लगेचच तिला त्रास होऊ लागला. यानंतर, वेदनेला सामान्य आहे असे सांगून उपचारासाठी फक्त पेनकिलर देण्यात आल्या.

मुलीने काळ्या रंगाने आपले डोळे रंगवले होते. खरं तर तिला रॅप आर्टिस्ट पोपेकसारखे डोळे रंगवायचे होते. दरम्यान, संबंधित टॅटू आर्टिस्टला मुलगी अंधत्व केल्याच्या आरोपाखाली 3 वर्षांच्या शिक्षा भोगावी लागू शकते. त्याच्यावर हेतू नसताना मुलीला अपंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तपासात दिसून आले कि, टॅटू कलाकाराने डोळ्याच्या रंगात गंभीर चुका केल्या आहेत.

डॉक्टरांनी सांगितले की, मुलीच्या डोळ्यास झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करता येणार नाही. तसेच मुलीच्या एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे निघून गेली आहे आणि लवकरच ती इतर दुसऱ्या डोळ्यानेही आंधळी होईल.