फसवणूकीचा नवा ‘फंडा’, महिलेने ‘ऑनलाइन’ भिक मागत १७ दिवसात कमवले ३५ लाख

दुबई : वृत्तसंस्था – आपण आपलं फेसबुक चालू केल्यांनतर आपल्याला भावुक करणाऱ्या अनेक पोस्ट आपल्याला दिसतात. समोरच्या व्यक्तीच दुःख पाहून आपल्याला राहवत नाही. आणि आपण त्या व्यक्तीला जमेल तितकी मदत करतो. पण त्या व्यक्तीची परिस्थिती खरच इतकी बिकट आहे का? हे आपण कधीच पाहत नाही. त्यामुळे याचा फायदा अनेक लोक घेतात. दुबईच्या एका महिलेने असाच सोशल मीडियाचा वापर करून १७ दिवसात ३५ लाख कमवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी कि दुबईच्या या महिलेने फेसबुक, इंस्टाग्राम यावर लोकांना अतिशय भावुक करणाऱ्या पोस्ट शेयर केल्या. त्यात तिने मला सासरकडून खूप त्रास होतो. आणि मी घटस्फोटित आहे. त्यामुळे माझ्या मुलांना पैसे लागतात अस तिने सोशल मीडियावर शेअर केलं. त्यामुळे लोकांना तिची दया आली. आणि त्यांनी तिला मदत केली.

परंतु, याबाबदल तिच्या पहिल्या पतीला माहिती मिळाली आणि त्यांने तिची पोलीस ठाण्यात तक्रार केली. यूएईच्या ‘खलीज टाइम्स’ च्या माहितीनुसार दुबई पोलीस क्राईम क्राइम ब्रांचचे डायरेक्टर ब्रिगेडियर जमाल अल सलेम अल जल्लाफ यांनी सांगितलं कि, हि महिला मला सासरचे खूप छळतात, माझा घटस्फोट झाला आहे. मुलासाठी पैसे हवेत असं सांगून लोकांकडून पैसे घेत होती. पण तिच्या पतीकडे चौकशी केलीअसता त्याने सांगितलं कि, मुलं त्या महिलीसोबत नाही तर माझ्यासोबत राहतात.

त्यामुळे सोशल मीडियावर मदत मागणारी लोक अशी पण असू शकतात. हा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. या महिलेला फक्त स्वतः साठी पैसे हवे होते. पण त्या महिलेने मुलांच्या नावाने भीक मागून लोकांना खोट बोलून लुबाडल्यामुळे दुबई पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’