नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निरोगी असाल तर हवे ते काम करता येते मात्र एखाद्या अपघाताला सामोरे जावे लागले तर शरीराचा एखादा अंग काम करत नाही. मात्र अमेरिकेतील महिला याला अपवाद ठरली आहे. महिलेचा कारसोबत अपघात झाला होता मात्र तरीही आज महिला चालती फिरती कम्प्युटर बनली आहे ज्यामुळे तिला कोणतेही काम करण्यात अडथळा येत नाही. 31 वर्षांपूर्वी अमेरिकेत राहणाऱ्या विंटर मेराज यांचा कार अपघात झाला होता ज्यामध्ये त्यांची पाठ आणि गुडघ्याचे हाड एकदम तुटले होते. तरीही अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला सावरले आणि रोजच्या कामांसाठी लायक बनवले.
विंटरने ऑपरेशनच्या दरम्यान आपल्या शरीरात माइक्रोचिप लावून घेतली. ज्याच्या मदतीने ती कोणालाही इमेल पाठवू शकते तर घराचा दरवाजा देखील उघडू शकते. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या बाजूला एलईडी लाईट्स आणि बोटाना चुंबक लावून घेतला आहे. ज्याच्या मदतीने त्या ऑफिसमध्ये काम करू शकतात. अमेरिकेतील एका वृत्तपत्राशी बोलताना विंटरने सांगितले की, ऑपरेशनने एक मानसिक दबाव तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्या भविष्यात खूप प्रगती करू शकल्या.
त्या म्हणतात, मि कोणाचीही वाट पाहिली नाही, यापेक्षा वाईट माझ्यासोबत काही होऊ नये म्हणून मी हे केले आहे आणि यामुळे मला अनेक गोष्टींपासून सुटका देखील मिळाल्याचे विंटर सांगतात. विंटर यांनी सांगितले की, माझ्या डाव्या हातामध्ये एक चिप टाकली गेली आहे ज्यामुळे मी दरवाजा उघडू शकते. तसेच या चिपमुळे त्यांच्या ऑफिसमधील देखील दरवाजे उघडले जातात. एवढेच नाही तर आणखी एक चिप त्यांच्या हातामध्ये आहे ज्यामध्ये त्यांच्या व्यवसायाबद्दलची सर्व माहिती देण्यात आलेली आहे.स्मार्टफोनच्या माध्यमातून लगेच स्कॅन करून कोणत्याही व्यक्तीची त्यांना माहिती मिळते.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- दातदुखी दूर करण्यासाठी ‘या’ तेलाचा होतो फायदा ! ‘हे’ आहे ६ फायदे
- तुम्हाला ‘रेड टी’ माहित आहे का? ‘हे’ आहेत ५ आरोग्यदायी फायदे
- कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी ‘या’ ७ घरगुती टिप्स !
- आठवड्यातून ५ वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्यास होतो ‘हा’ फायदा
- छोट्या-छोट्या गोष्टींवर रडू येते का? ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- ‘योगा’मुळे कमी होते नैराश्याची तीव्रता, ‘हे’ आहेत ५ परिणाम
- भुकेमुळे राग येत असेल तर करा ‘हे’ ५ उपाय, जाणून घ्या