कॅन्सरचं कारण सांगून मित्राकडून 8 लाख रूपये लुबाडणार्‍या महिलेचा पर्दाफाश

पोलीसनामा ऑनलाईन टीम, दि. 12 डिसेंबर : कॅन्सर असल्याचं खोटं कारण सांगून मित्राकडून 8 लाख रूपये लुबाडणार्‍या महिलेचा एका गोष्टीमुळे पर्दाफाश झालाय. तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कारवाईनंतर तिला तुरूंगाची हवाही खावी लागेल.

इंग्लंडच्या चेशायरमध्ये राहणार्‍या टोनी स्टॅन्डेनने तिला कॅन्सर आसल्याचं सांगत मित्रांची फसवणूक केली. तिने कॅन्सरच्या नावावर आपल्या मित्रांकडून 8 लाख रूपये लुबाडले. अन् शाही लग्न केलं. एवढच नव्हे तर, तिने आपल्या मित्रांना कॅन्सर नसल्याचं कळू नये म्हणून टक्कलही केलं होतं. पण, तिच्या एका फोटोमुळे तिचा सगळा कारनामा उघड झाला. आता या महिलेवर तुरूंगाची हवा खाण्याची वेळ आलीय.

टोनीला नेहमीच ग्रॅड लग्न करण्याची इच्छा होती. तिचं स्वप्न होतं की, सिनेमात दाखवतात तसं व्हावं. पण, तिच्याकडे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे नव्हते. मग, तिने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक प्लॅन आखला.

टोनीने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट टाकून म्हणाली, तिला कॅन्सर आहे. डॉक्टरांनी सांगितले की, जर वेळी उपचार केले गेले नाही तर, ती 2 महिने जगणार आहे. ट्यूमर झाला असून तिच्या शरीरातील अवयव निकामी होत आहेत, असे तिने लिहलं होतं.

त्यानंतर तिने इन्स्टावर काही विना मेकअपचे फोटो टाकले. जेणेकरून ती आजारी दिसावी. आपल्या मैत्रीणीची ही स्थिती बघून टोनीच्या मित्रांनी तिच्यासाठी पैसे जमा करणे सुरू केलं.

आता टोनीने मित्र तिच्यावर विश्वासघाताचा आरोप लावत आहेत. तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कारवाईनंतर टोनी तुरूंगाची हवाही खावी लागेल.

कॅन्सरसाठी जमा झालेल्या पैशातून टोनीने 52 वर्षीय बॉयफ्रेन्डसोबत लग्न केलं. तिने तिच्या स्वप्नातील लग्नासारखं लग्न केलं. नंतर कपल तुर्कीला गेलं. त्यांनी सोशल मीडियावर दोघांचे काही फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून टोनीच्या मित्रांना संशय आला.

त्यानंतर टोनीने इन्स्टावर ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली. तेव्हा तिच्या मित्राचा संशय आणखी वाढला. त्यांनी लगेच कॅन्सर हॉस्पिटलमधून टोनीचे डीटेल्स मागवले अन् तेव्हा तिचा सगळा भांडाफोड झाला.

आता टोनीने मित्र तिच्यावर विश्वासघाताचा आरोप लावला आहे. तसेच तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कारवाईनंतर टोनी तुरूंगाची हवाही खावी लागू शकते, अशी स्थिती आहे.