गर्लफ्रेंडला करत होता ‘चीट’, स्मार्टवॉचने केली धोकेबाज प्रियकराची पोलखोल, आणि नंतर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सध्या लोक अतिशय सतर्क राहतात. अलिकडेच एका महिलेला फिटबिटमुळे फसवणूक करत असलेल्या पार्टनरबाबत समजले. फिटबिट एक स्मार्टवॉच आहे ज्याच्या मदतीने लोक आपल्या फिटनेसची काळजी घेतात. परंतु, हेच स्मार्टवॉच एका कपलच्या ब्रेकअपचे कारण बनले आहे.

नाडिया नावाच्या महिलेला तिच्या धोकेबाज प्रियकराबाबत फिटनेस ट्रॅकरच्या एका नोटिफिकेशनच्या द्वारे समजले. महिलेने या गोष्टीचा खुलासा एका व्हिडिओद्वारे केला आहे. महिलेने व्हिडिओमध्ये सांगितले की, एकदा तिचा बॉयफ्रेंड कामावरून रात्री खुप उशीरा घरी आला होता. ती सकाळी उठली तेव्हा तिने आपल्या बॉयफ्रेंडसाठी ब्रेकफास्ट तयार करण्याचा विचार केला. तेव्हा तिच्याकडे एक नोटिफिकेशन आले.

नाडिया रात्री उशीरा घरी आलेल्या आपल्या प्रियकरासाठी नाश्ता बनवण्याचा विचार करत असतानाच तिला फिटबिटवर एक नोटिफिकेशन आले. यामध्ये लिहिले होते की, तिच्या प्रियकराने रात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान 500 पेक्षा जास्त कॅलरी बर्न केली आहे. जेव्हा हा मॅसेज नाडियाने वाचला तेव्हा तिला धक्काच बसला, आणि नंतर तिने आपल्या प्रियकराशी ब्रेकअप केले.