अबब ! 30 लाखांची ब्रा, अंतरवस्त्रामुळं महिला ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विमान तळावर ब्रामधे सोने लपवून आणणाऱ्या महिलेला कस्टम विभागाने पकडले. या महिलेने ब्रामधून तीस लाख रुपयांचे सोने लपवून आणले होते. हि महिला मॉस्कोहून भारतात आली होती. महत्वाचे म्हणजे या महिलेने ब्राच्या इलॅस्टिकच्या जागी चार सोन्याच्या तारा देखील लपवून आणल्या होत्या. तसेच इतर कपड्यांमध्ये चार सोन्याची बिस्किटे देखील लपवून आणली होती.

अधिकाऱ्यांना आला संशय –
या महिलेने विमानतळावर प्रवेश केल्यानंतर तिच्या हालचालींवरून कस्टम अधिकाऱ्यांना तिचा संशय आला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या महिलेला तस्करीप्रकरणी अटक केली आहे.

ब्रामधे सोन्याच्या चार तारा –
पोलिसांनी तिच्या कपड्यांची व्यवस्थित पाहणी केली असता तिच्या ब्रामधे पोलिसांना चार सोन्याच्या तारा आढळून आल्या. तसेच इतरदेखील सहा सोन्याची बिस्किटे आढळली. या सोन्याचे एकूण वजन 794 ग्राम भरले आहे. त्यामुळे तिला कस्टम कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

Visit : policenama.com