हैदराबादची घटना ताजी असताना हरियाणामध्ये जाळलेल्या महिलेचा मृतदेह आढळला, सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर रस्त्यावर जाळण्याच्या घटनेला जास्त दिवस झाले नाही तर अशीच एक धक्कादायक घटना हरियाणाच्या नुहमध्ये समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी तावडू नुह रोडवर महिलेचा जळालेला मृतदेह सापडला आहे. मात्र, महिलेची ओळख पटलेली नाही. या प्रकरणात, मेवात पोलिसांची दोन पोलिस ठाणे हद्दीच्या वादात अनेक तास गुंतलेली होती, अखेर कोणाच्या हद्दीत हा विषय येईल.

संपूर्ण प्रकरण मेवात जिल्ह्यातील नूह ते तावडू या रस्त्यावरील आहे. ज्या रस्त्यावर अरावली पर्वत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षाच्या महिलेचा मृतदेह दिसत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/