पाळण्यात मुलासोबत ‘भूत’ पाहून आईची उडाली ‘भंबेरी’, त्यानंतर समोर आलं ‘वास्तव’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – आजकाल आपल्या मुलांवर आई वडील विविध प्रकारे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता विविध तंत्रज्ञानामुळे मुलांपासून दूर राहून देखील मुलांच्या हलचालीवर लक्ष ठेवणारे आई वडील आहेत. परंतू अनेकदा हे तंत्रज्ञान घातक ठरु शकते.

नुकतेच मेरित्जा एलिजाबेथ नावाच्या महिलेबरोबर ही घटना घडली, जे पाहून त्या महिलेला आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. मेरीत्जाने आपल्या मुलावर लक्ष ठेवण्यासाठी घरात कॅमेरे बसवले आहेत. त्या या कॅमेराच्या माध्यमातून पाहत असतात की त्यांचा मुलगा ठीक आहे की नाही. शुक्रवारी रात्री मेरीत्जा एलिजाबेथ आपल्या मुलाला जेव्हा कॅमेरातून पाहत होती तेव्हा त्यांना आपल्या मुलाच्या बाजूला भूत दिसले. मेरीत्जा यावर विश्वास ठेवत नव्हती परंतू जेव्हा त्यांनी फूटेज पाहिले आणि बंद करुन पुन्हा सुरु केले तेव्हा त्यांच्या मुलाच्या बाजूला एका लहान मुलाचे भूत स्पष्ट दिसत होते.

So last night I was positive there was a ghost baby in the bed with my son. I was so freaked out, I barely slept. I even…

Geplaatst door Maritza Elizabeth op Vrijdag 18 oktober 2019

परंतू काही वेळाने त्यांच्या हा भ्रम दूर झाला कारण तो एका ऑप्लिटकल भ्रमाचा प्रकार होता. पाळण्यात असलेल्या गादीवर ब्रँडिंगच्या कारणाने एक सावली दिसत होती, जी त्यांना भूतासारखी होती. मेरित्जाने हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला. सोशल मिडियावर टाकलेल्या या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की मुलाच्या बाजूला एका लहान मुलाचा फोटो आहे. रात्री जेव्हा पाळण्यातील गादीवर नीट पाहिले तेव्हा एका लहान मुलाचा चेहरा भूतासारखा दिसत होता, ज्या पाळण्यात मुलं झोपलं होते त्या गादीवर एका लहान मुलाचा ब्रॅंडिंगचा फोटो आहे, जो एका भूतासारखा वाटला.

Image may contain: 1 person   Image may contain: one or more people

Visit : Policenama.com

You might also like