Video : पहिल्यांदा पॅराग्लायडिंग करणार्‍या मुलीची अशी झाली स्थिती; व्हिडीओ झाला व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन  – आपणास 2019 मधील एक गंमतीदार पॅराग्लायडिंग व्हिडिओला आठवतो का? ज्यात विपिन साहू नावाच्या एका व्यक्तीने पॅराग्लायडिंग दरम्यान घाबरून स्वत:ला शिवीगाळ करत होता. तसेच पॅराग्लायडिंग प्रशिक्षकाकडे खाली उतरविण्याची विनंती करत होता. यावेळी त्याने प्रशिक्षकाला म्हटलं होतं की, 500 रूपये ज्यादा घे, पण अगोदर खाली उतरवं. आता अशाच एक गंमतीदार व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ एका मुलीचा आहे. हाच पॅराग्लायडिंग व्हिडिओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल होत आहे.

हि अज्ञात मुलगी हिमाचल प्रदेशच्या खाजगार येथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी पोहचली होती. ज्यावेळी पॅराग्लायडिंग करण्यास सुरूवात होते. त्यावेळी हि मुलगी हवेत जाऊ लागते. त्यानंतर ती खूप घाबरते. घाबरून ती डोळेहे उघडू शकत नाही. अशावेळी ती प्रशिक्षकाला खाली उतरविण्याची विनंती करू लागते. हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा पॅराग्लायडिंग व्हिडिओ गो प्रोमध्ये रेकॉर्ड झाला आहे. गो प्रो घेऊन हि मुलगी पॅराग्लायडिंग करण्यासाठी गेली होती. पण, तिचा गंमतीदार पॅराग्लायडिंग व्हिडिओ गो प्रोमध्ये कैद झाला आहे. यात, असेही कैद झालं आहे की, जेव्हा लँडिंग केलं जातानाही ती मुलगी खूप घाबरलेली असते. त्यामुळे या पॅराग्लायडिंग व्हिडिओवरून त्या साहूचा पॅराग्लायडिंग व्हिडिओ आठवतो. तो देखील असाच घाबरला होता. असे गंमतीदार पॅराग्लायडिंग व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.