Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसवरील लस शोधणार्‍या ऑक्सफोर्डच्या टीममध्ये ‘ही’ भारतीय महिला, महत्वाच्या पदावर कार्यरत

कोलकाता : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस जगभरात पसरला असून अनेक देशांमध्ये त्याची लस आणि उपचार लवकरात लवकर शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या क्रमवारीत अनेक देशांतील नामांकित विद्यापीठेही संशोधनात गुंतलेली असून असेच एक संशोधन ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची टीम करत आहे. कोरोनाची लस तयार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वैज्ञानिकांच्या टीममध्ये एक भारतीय देखील सहभागी आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एक महिला कोविड-१९ ची लस विकसित करण्याचा प्रयत्न करत असलेल्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये महत्वाची भूमिका निभावत आहे.

ऑक्सफोर्डमध्ये राहणारी ३४ वर्षीय चंद्रा दत्ता अँटी-व्हायरल वेक्टर लस – ChAdOx1 nCoV-19 तयार करण्यासाठी युनिव्हर्सिटी फॅसिलिटी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये क्वालिटी इन्शुरन्स मॅनेजर म्हणून काम करत असून मागील आठवड्यातच विद्यापीठाने मानवावर या लसीची चाचणी सुरू केली आहे.

आई-वडिलांना अभिमान
चंद्राचे वडील ६५ वर्षांचे असून त्यांचे नाव समीर कांती आणि ५८ वर्षीय आईचे नाव कावेरी दत्ता आहे आणि ते कोलकाताच्या गोल्फ गार्डन परिसरात राहतात. त्यांना त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा अभिमान आहे, जी लस विकासावर काम करणाऱ्या मुख्य वैज्ञानिकांपैकी एक म्हणून काम करत आहे. तरी त्यांना भीती वाटत आहे की यूकेमध्ये नवीन प्रकरणे वाढत आहेत. चंद्राची आई कावेरी म्हणाल्या की, ‘माझी मुलगी नेहमीच महत्वाकांक्षी आणि बुद्धिमान राहिली आहे. कोरोनो व्हायरस ज्या प्रकारे पसरत आहे, त्याबद्दल मला खूप काळजी वाटते.’

मागच्या डिसेंबरमध्ये आली होती घरी
चंद्राने सुरुवातीचे शिक्षण गोखले मेमोरियल गर्ल्स स्कूलमधून केले आणि हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीटेक केले. ती लीड्स विद्यापीठात बायोसायन्स विषयात एमएससी करण्यासाठी २००९ मध्ये यूकेला गेली.

गेल्या वर्षी ऑक्सफोर्ड येथे नोकरी करण्यापूर्वी चंद्राने बर्‍याच ठिकाणी वेगवेगळ्या महत्वाच्या पदावर काम केले. सध्या ती विद्यापीठातील सिने-बायो-मॅन्युफॅक्चरिंग सुविधेत कार्यरत आहे, जी जगभरातील प्रारंभिक टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी व्हायरल वेक्टर लस तयार करते आणि सध्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये कोविड-१९ साठी विकसित करण्यात येत असलेल्या लसीची चाचणी करत आहे.

चंद्राच्या वडिलांनी सांगितले की, ती मागच्या डिसेंबर मध्ये घरी आली होती आणि काही आठवडे इथेच होती. ते म्हटले, ‘मागच्या वेळी आम्ही तिला भेटलो होतो. मला अभिमान आहे कि माझी मुलगी एवढ्या उदात्त कार्यात सामील आहे.