वाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, दोघांना अटक, एकजण फरार

अहमदनगरः पोलीसनामा ऑनलाइन- जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून वाघ्याला बांधून ठेवत मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. नगरजवळच्या निबोंडी गावात शुक्रवारी (दि. 2) रात्री ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण फरार आहे.

या प्रकरणी पिडीत महिलेने भिंगार कॅंप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय कचरू माळी (रा. निंबोडी, ता. नगर), आकाश पोटे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर नीलेश पोटे फरार आहे. तिन्ही आरोपी शेतात काम करणारे मजूर आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला आष्टी तालुक्यातील महिला जागरण गोंधळात मुरळीचे काम करते. नगर येथे एका कार्यक्रमासाठी ती आपल्या सहकाऱ्यासह गेली होती. त्या ठिकाणचा कार्यक्रम आटोपून ते घराकडे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी रस्त्यात निंबोडी शिवारात लघुशंकेसाठी ते थांबले होते. तेंव्हा तिघेजण तिथे आले. त्यांनी दोघांना बळजबरीने ओढळून जवळच्या शेतात नेले. महिलेसोबतच्या सहकाऱ्याला बांधून ठेवत तिघांनी महिलेवर बलात्कार केला. त्यांच्याकडील नऊ हजार रुपये काढून घेऊन आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक भय्यासहेब देशमुख यांनी तातडीने हाचचाली केल्या. तांत्रिक तपास करून आरोपींची माहिती आणि ठावठिकाणा मिळविला. काही वेळातच आरोपी माळी याला नगरमधून अटक केली. दुसरा आरोपी पुण्याला पळून गेला होता. तेथून त्याला अटक केली आहे. आता तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.