युवकांनी महिलेचे ‘हात-पाय’ बांधून केला कारमध्ये सामुहिक बलात्कार, बनवला व्हिडीओ

फतेहपुर (राजस्थान) : वृत्तसंस्था – कारमध्ये महिलेचे हातपाय बांधून तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील फतेहपुरमध्ये घडली आहे. ही महिला गुरुवारी लग्न समारंभ उरकून घरी परतत असताना आरोपींनी तिचे अपहरण करून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी एकजण सीआरपीएफचा जवान आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पीडित महिला (वय-५६) गुरुवारी एका लग्न सोहळ्यासाठी गेली होती. लग्न सोहळा संपल्यानंतर घरी परतत असताना आरोपींनी तिचे अपहरण केले. तिला एका कारमध्ये नेऊन तिचे हातपाय बांदले. आरोपींनी तिच्यावर तिन तास सामूहिक बलात्कार करून त्याचा व्हिडीओ काढला. आरोपींनी रात्री नऊच्या सुमारास या महिलेले तिच्या घरापासून काही अंतरावर सोडून दिले. महिलेने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींनी अटक केली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.

फतेहपुरचे पोलीस उपायुक्त कुशाल सिंह यांनी सांगितले की, पीडीत महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. लग्न समारंभावरुन परतत असताना आरोपींनी पीडित महिलेला घरी सोडतो असे सांगितले. मात्र, तिने नकार दिल्याने आरोपींनी बळजबरीने तिला कारमध्ये बसवले. आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिला रात्रीच्या सुमारास घरी सोडले. या प्रकरणात मनोज जाखड आणि विरेंद्र या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी ज्यावेळी हे कृत्य केले त्यावेळी त्यांनी मद्यप्राशन केले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैंकी मनोज हा सीआरपीएफचा जवान असून त्याला २०१६ मध्ये फरार घोषीत करण्यात आले आहे. त्याच्यावर लक्ष्मणगढ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

 

Loading...
You might also like