11 वर्षाचा मुलगा बनला ‘बाप’, महिलेनं मुलाला जन्म दिल्यापासून कुटूंब ‘अनभिज्ञ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका 28 वर्षाच्या महिलेला अकरा वर्षाच्या मुलासोबत संबंध ठेवल्यामुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील ही घटना आहे. त्यावेळी महिला मरिसा मौरी 22 वर्षांची होती.

ही महिला त्या अकरा वर्षाच्या मुलांच्या घरी राहून नॅनीचे काम करत होती. यावेळी 2014 मध्ये तीने मुलाशी संबंध जोडले. न्यायालयाने महिलेला 20 वर्ष जेलची शिक्षा सुनावली आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर देखील घरच्यांना महिलेच्या या कारनाम्याची माहिती लागलेली नव्हती. पीडित मुलाच्या घरच्यांना वाटले की महिला आपल्या बॉयफ्रेडीमुळे आई झाली आहे.

महिलेने सात महिन्यामध्ये कमीत कमी पंधरा वेळा मुलासोबत दुष्कृत्य केले. परंतु मुलाने कोणालाही या बाबत माहिती दिली नाही. 2017 मध्ये महिलेला अटक करण्यात आली त्यावेळी याबाबत खुलासा झाला. आता त्या पीडित मुलाचे वय 17 वर्षे आहे. न्यायालयात शिक्षा सुनावताना पीडित मुलगा आणि त्या महिलेचा पाच वर्षाचा मुलगा देखील न्यायालयात हजार होता. कारागृहातून बाहेर आल्यावर महिलेला लैगिक गुन्हेगारी बाबतची नोंदणी करावी लागणार आहे.

 

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like