खळबळजनक ! तिनं दीर आणि सासूला दिल्या ‘झोपे’च्या गोळ्या, बोलावलं ‘बॉयफ्रेन्ड’ला अन् पुढं झालं ‘असं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील हिरीचंद सिमरा या गावात आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी एका महिलेने आपल्या संपूर्ण कुटुंबाला झोपेच्या गोळ्या दिल्या. मात्र मध्यरात्रीनंतर सर्वांची प्रकृती खालावली असता त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्नालयात हलविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसानी या महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे.
दवाखान्यात दाखल झालेल्या कुटुंबातील चार लोकांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरीचंद सिमरा गावात राहणारे रामरत्न हरिद्वार हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी मीना (बदललेले नाव) एक मुलगी, आई आणि भाऊ राहतात. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या इसमाबरोबर त्यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे महिलेने तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तिने आपल्या कुटुंबाला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची तब्येत बिघडली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात महिलेसह तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली असून त्यांच्याकडे चौकशी केली असता हि धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश देखील पोलिसांनी दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त