शाकाहारी ऐवजी मिळाला मांसाहारी पिझ्झा, मुलीनं मागितले 1 कोटी रूपये, म्हणाली – ‘महागडे उपवास करावे लागतील’, जाणून घ्या प्रकरण

पोलिसनामा ऑनलाईन टीम, दि. 14 मार्च 2021 – दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका कंपनीला एका महिलेला शाकाहारी ऐवजी मांसाहारी पिझ्झा देणं महागात पडले आहे. याप्रकरणी त्या महिलेने आता कंपनीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच या महिलेने कंपनीवर 1 कोटी रुपयांच्या नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

गाझियाबादमध्ये शाकाहारी महिलेने एका अमेरिकन रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी (व्हेज) पिझ्झा मागविला होता. पण, चुकून त्या महिलेला मांसाहारी (नॉन-व्हेज) पिझ्झा दिला. यामुळे या कंपनीने धार्मिक न्यायाला दुखावली आहे, असा आरोप या महिला ग्राहकने केला आहे. तसेच या ग्राहक महिलेने या कंपनीविरूद्ध न्यायालयात 1 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा केला आहे. या महिलेने सांगितले की, तिच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. आणि त्याचे नुकसान कमी करण्यासाठी तिला कठोर आणि महागड्या कर्मकांडांतून जावे लागेल.

याबाबत एका वृत्तसंस्थेने बातमी दिली आहे, त्यानुसार, दीपाली त्यागी यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की, ती धार्मिक श्रद्धा, शिकवण, कौटुंबिक परंपरा, तिचा स्वतःचा विवेक आणि तिच्या आवडीनुसार शुद्ध शाकाहारी आहे. शाकाहारी समजून दिलेला नॉन-व्हेज पिझ्झा खाल्ल्यानंतर तिने पिझ्झा खाणे बंद केलं आहे.

21 मार्च 2019 रोजीचं हे प्रकरण सुमारे दोन वर्ष जुने आहे. होळी साजरी केल्यानंतर, दीपालीने गाझियाबादमधील पिझ्झा आउटलेटमधून कुटुंबासाठी शाकाहारी पिझ्झाची ऑर्डर दिली. जेव्हा बर्‍याच दिवसानंतर पिझ्झा सर्व्ह केला गेला, तेव्हा त्यांनी होणारा विलंब दुर्लक्षित करून पिझ्झाचा एक तुकडा खाल्ला. त्यानंतर त्यांना समजले की, पिझ्झामध्ये मशरूमऐवजी मांसाचे तुकडे आहेत.

दीपालीचे वकील फरहत वारसी यांनी याबाबत ग्राहक कोर्टाला सांगितले की, दीपालीने त्वरित ग्राहक सेवा अधिकार्‍याला बोलावून व्हेज पिझ्झाच्या जागी घरी नॉन-व्हेज पिझ्झा दिला असल्याचे सांगितले आहे. तसेच कंपनीने केलेल्या चुकांची तक्रार त्यांच्याकडे केली आहे.

याप्रकरणी एएनआयच्या अहवालात म्हटले आहे की, काही दिवसांनंतर पिझ्झा आउटलेटमधील व्यवस्थापकाने दीपालीला फोन करून तक्रारदाराच्या संपूर्ण कुटुंबाला विनामूल्य पिझ्झा देण्याचे आश्वासन दिले. तथापि, तक्रारदाराने त्यांना पुन्हा सांगितले की, हे प्रकरण किरकोळ नाही. कंपनीने धार्मिक श्रद्धा आणि प्रथा दुखावल्यामुळे त्यांना कायमचा मानसिक त्रास झाला आहे, असे फिर्यादी वकीलांचे म्हणणे आहे. ते असेही म्हणाले की, आता त्यांना बर्‍याच मोठ्या आणि महागड्या धार्मिक विधी करावे लागतील, ज्यासाठी त्याला आयुष्यभर कोट्यावधी रुपये खर्च येईल.