चुकीच्या इंजेक्शनमुळे जन्माला आली मुलगी, जोडप्याला मिळाले 74 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –अमेरिकेच्या सिएटलमध्ये न्यायाधीशाने एका परिवाराला 74 कोटींपेक्षा जास्त रक्कम देण्याचा निर्णय दिला आहे, कारण त्या महिलेला नर्सने चुकीचे इंजेक्शन दिले होते. ही महिला बर्थ कंट्रोल इंजेक्शनसाठी कम्युनिटी क्लिनिकमध्ये गेली होती; परंतु तिला फ्लूची लस देण्यात आली. खरं तर, चुकीचे इंजेक्शन दिल्यानंतर या जोडप्याला एक अपंग मुलगी झाली. न्यायाधीशांनी मुलीसाठी 55 कोटी रुपयांचा आदेश दिला, तर या जोडप्यास भरपाईसाठी 18 कोटी रुपये दिले.

न्यायाधीश म्हणाले की, मुलीला उपचार, अभ्यास आणि इतर खर्चासाठी पैसे दिले जात आहेत. अहवालानुसार, येसेनिया पचेको नावाच्या महिलेला आई बनण्याची इच्छा नव्हती, परंतु नर्सच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे त्या गर्भवती झाल्या. त्या महिलेला सरकारी दवाखान्यात इंजेक्शन दिले असल्याने अमेरिकेच्या फेडरल सरकारला या चुकांसाठी जबाबदार धरण्यात आले. तथापि, या जोडप्याला सुमारे 5 वर्षे न्यायालयात संघर्ष करावा लागला.

येसेनिया पचेको वयाच्या 16 व्या वर्षी निर्वासित म्हणून अमेरिकेत आल्या. घटनेच्या वेळी त्या दोन मुलांची आई होत्या आणि कुटुंब वाढवायची इच्छा नव्हती. नर्सने पचेकोचा चार्ट न पाहता फ्लूची लस दिली होती.