पतीच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी महिलेने दिला बाळाला जन्म, म्हणाली ‘हा’ चमत्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली असून येथील एका महिलेने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी मुलाला जन्म दिला. या महिलेच्या पतीचा दहा वर्षांपूर्वी कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्याआधी त्याने आपले वीर्य जमा केले होते. त्यानंतर आता त्या विर्याच्या मदतीने आणि आईवीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने हि महिला त्याच्या मुलाची आई बनली आहे.

ब्रिटन मधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 वर्षानंतर अशा प्रकारे मुलाला जन्म देणे म्हणजे हा एक चमत्कारच आहे. एंजिलीन असे या महिलेचे नाव असून तिचे 2007 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर 2008 मध्ये 29 वर्षीय तिच्या पतीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. याविषयी बोलताना या महिलेने म्हटले कि, आम्ही अनेक वेळा आमच्या संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न बघितले होते. आम्हाला पाच मुले हवी होती. मात्र दुर्दैवाने ते शक्य झाले नाही. हि महिला आपल्या पतीच्या वीर्याने 2013 मध्ये गर्भवती राहिली होती. त्यानंतर 5 वर्षांनी ती पुन्हा गर्भवती राहिली. पहिल्या वेळी तिने मुलाला जन्म दिला तर दुसऱ्या वेळी मुलीला.

दरम्यान, आपल्या मुलांमध्ये आपल्याला पतीचा चेहरा दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर तिने आपल्या मुलांची नावे देखील आपल्या पतीच्या आवडीची ठेवली आहेत.

आरोग्यविषयक वृत्त-