‘सुडौल’ बांद्यासाठी महिलेला नितंबाची ‘सर्जरी’ करणं पडलं महागात, असे ‘हाल’ झाले

पोलीसनामा ऑनलाइन – सुडौल बांदा आणि सुंदर दिसण्यासाठी अनेक लोक सध्या कॉस्मेटिक सर्जरी करून घेत आहेत. परंतु, सर्जरी चुकीची झाल्यास जीवावर बेतू शकते. असाच एक प्रकार कोलंबियात समोर आला आहे. येथे एका 52 वर्षीय महिलेने बट (नितंब) लिफ्टिंग सर्जरी केली, जी तिला महागात पडली.

एलेडा गार्सिया ऑर्टेज नावाच्या महिलेने बट लिफ्टिंग सर्जरी केली. या दरम्यान एलेडाच्या नितंबावर कुकिंग ऑईलचे इंजेक्शन देण्यात आले, परंतु काही दिवसातच एलेडाच्या शरीरात इन्फेक्शन झाले आणि तिची प्रकृती बिघडली.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, एलेडाने 4 मिलियन कोलंबियाई पेसोस म्हणजे सुमारे 85,000 रुपयात ही बट लिफ्टिंग सर्जरी केली. ही सर्जरी तिने एका स्थानिक क्लिनिकमध्ये केली.

सर्जरीच्या काही दिवसानंतर एलेडाचे नितंब लाल झाले आणि त्यावर सूज आली. सोबतच नितंबाचा आकारही विचित्र झाला. बघता-बघता एलेडाच्या शरीरात इन्फेक्शन पसरले आणि ती आजारी पडली.

यादरम्यान तिच्या कुटुंबियांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणीत डॉक्टरांना आढळले की, कुकिंग ऑईलचे इंजेक्शन दिल्याने तिला भयंकर इन्फेक्शन झाले होते.

जेव्हा ही माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली, तेव्हा समजले की, ज्या क्लिनिकमध्ये तिने बट लिफ्टिंग सर्जरी केली त्यांच्याकडे अधिकृत लायसन्स नाही, तसेच अनुभवसुद्धा नव्हता.

एवढेच नव्हे, ज्या महिला डॉक्टरने एलेडाची सर्जरी केली ती गायब झाली आहे. तपासात महिती मळाली की, सर्जरी करणार्‍या महिलेकडे वैद्यकीय पात्रता नव्हती. या घटनेनंतर एलेडाच्या कुटुंबियांनी सर्जरी करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.