अविश्वसनीय ! ‘या’ महिलेच्या ‘दात’ अन् ‘हिरड्या’तून उगवतात ‘केस’, डॉक्टर देखील झाले ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आपल्या शरीराच्या अनेक भागांवर केस येत असतात. काही लोकांना आपल्या शरीरावरील केस आवडतात देखील परंतु जेव्हा तोंडाच्या आत हिरड्यांमध्ये केस उगवत असतील तर तेव्हाची स्थिती ही अनावर होण्यासारखीच असेल. आपण त्या व्यक्तीचा विचार करा ज्याच्या तोंडात दात आणि हिरड्यांमध्ये केस उगवले आहेत. इटलीच्या एका महिलेबरोबर असेच काही झाले आहे. तिच्या दात आणि हिरड्यांच्या मध्ये केस उगवले आहेत.

 

इस महिला के दांतों-मसूड़ों में उग रहे हैं बाल, डॉक्टर भी हैरान...

इटलीच्या एका २५ वर्षीय तरुणीच्या तोंडात दात आणि हिरड्यांच्या मधेच केस उगवले आहेत. दात आणि हिरड्यांमध्ये केस उगवणे ही एक अत्यंत दुर्मिळ बायोलॉजिकल स्थिती आहे. याबद्दल डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले आहे. डॉक्टरांना हे समजले नाही की यामागील नेमके कारण कोणते आहे?

इटली येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हा एक पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (Polycystic Ovary Syndrome – PCOS) नामक दुर्मिळ आजार असू शकतो जो की महिलेला जडलेला असावा. तर काही डॉक्टर यास गिंगीवल हर्सुटिज्म (Gingival Hirsutism) नावाचा आजार देखील सांगत आहेत. यामध्ये शरीराच्या अशा भागात केस उगवतात जेथे उगवायला नकोत. तथापि, डॉक्टरांना अजून याचे ठोस कारण सापडले नाही.

इस महिला के दांतों-मसूड़ों में उग रहे हैं बाल, डॉक्टर भी हैरान...

पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (Polycystic Ovary Syndrome – PCOS) च्या आजारात माणसाच्या शरीराच्या अशा भागात केस उगवतात जेथे उगवायला नकोत. याचा उपचार जवळपास १० वर्ष चालतो. या उपचारादरम्यान हार्मोन्स च्या स्तराला सुधारले जात असते. इटलीची ही महिला २००९ ला देखील तिच्या घशात आणि हनुवटीत केस येत असल्याची समस्या घेऊन ती डॉक्टरांकडे गेली होती.

ही महिला १५ वर्षाची असताना तिला टेस्टोस्टेरॉन (Testosterone) अधिक असण्याची समस्या समोर आली होती. परंतु याचा उपचार झाला आहे. डॉक्टरांनी आता तिच्या हिरड्या च्या ऊतकांची (Tissues) तपासणीही केली आहे पण त्याचे कोणतेही कारण कळू शकले नाही.

असे पहिल्यांदाच झाले आहे एखाद्या महिलेस असा आजार जडला असेल. या अगोदर संपूर्ण जगामध्ये फक्त पाच पुरुषांना असा आजार झाला आहे. या पुरुषांच्या तोंडात दात आणि हिरड्यांमध्ये केस उगवले होते.

डॉक्टरांचे असे देखील म्हणणे आहे की महिला गिंगिवल हर्सुटिज्म (Gingival Hirsutism) या आजाराने पीडित आहे. हा आजार ज्यांना झाला आहे त्यांच्या बाबतीत एक विशेष रिसर्च रिपोर्ट ओरल पॅथोलॉजी जनरल मध्ये नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.