धक्‍कादायक ! बलात्कारामुळे ४ वेळा राहिली प्रेग्नेंट, बलात्काऱ्याला मिळाली मुलांना भेटायची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील अलाबामा येथे एक विचित्र घटना पाहवयास मिळाली आहे. येथील एका महिलेने आरोप केला आहे कि, वयाच्या १२ व्या वर्षांपासून तिच्या सख्या काकाने तिच्यावर वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत बलात्कार केला होता. या बलात्कारामुळे या काळात ती चारवेळा प्रेग्नेंट राहिली. त्यानंतर आता तिच्या बलात्कारी काकाला तिच्या मुलांना भेटण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अमेरिकेतील या राज्यात गर्भपातास कायद्याने बंदी असल्याने अनेक महिला आणि मुलींना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात विरोध देखील केला जात आहे. त्यामुळे स्वतःची हकीगत सांगून तिने महिलांची बाजू मांडली आहे. आणि हा कायदा कशा प्रकारे महिलांसाठी घातक आहे हेदेखील सांगितले आहे.

या राज्यात जर महिलांवर त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून बलात्कार झाला असेल तर कायदा त्यांना त्या महिलेस त्या मुलांना भेटण्यापासून रोखू शकत नाही. त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिच्यावर बलात्कार केल्यानंतर ती त्या काळात चार वेळा गर्भवती राहिली. यामध्ये एकदा तिचा गर्भपात आला तर एका मुलाचा मृत्यू झाला असून ती सध्या आपल्या दोन मुलांसह राहते.

मात्र तिच्या काकाच्या विरोधात बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले होते. मात्र नंतर कोर्टाने ते लग्न बेकायदेशीर ठरवले होते. लेनिअन बारनेट असे त्या व्यक्तीचे नाव असून एका गुन्ह्यातून बाहेर आल्यानंतर त्याने आपल्या दोन्ही मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर कोर्टाने त्याला मुलांना ३ दिवस भेटण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान, महिलेने या प्रकरणावर बोलताना म्हणाली कि, संपूर्ण आयुष्य तिने याच भीतीत घालवले कि, बलात्कारी तिचा खून करू शकतो, मात्र आता तिला तिच्या मुलांच्या कस्टडीसाठी झगडावे लागत आहे.

सिनेजगत

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

 

 

You might also like