खळबळजनक ! ‘अनैतिक’ संबंधांच्या ‘आड’ येणार्‍या पोटच्या मुलीचा आईनं केला खून, ‘Facebook’वर विकले कपडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका आईने आपल्या दोन मुलींची हत्या केल्याचा प्रकार घडला. या आईला तिच्या सेक्स लाईफमध्ये येत असलेल्या अडचणीमुळे तिने आपल्याच पोटच्या मुलींचा जीव घेतला. लूसे पोर्टन नामक महिलेला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा प्रकार ब्रिटनच्या रग्बी शहरात घडला. या हत्येनंतर न्यायालयात सांगण्यात आले की, हत्येच्या काही दिवसानंतर महिला पैसे घेऊन सेक्सची ऑफर देत होती.

18 दिवसांच्या अंतराने हत्या –

या प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर न्यायालयाने २३ वर्षाच्या या महिलेला शुक्रवारी शिक्षा ठोठावण्यात आली. महिलेने न्यायालयात मात्र मुलींची हत्या केल्याच्या आरोपाला नकार दिला. मागील वर्षी १८ दिवसांच्या अंतराने ३ वर्षांची मुलगी लेक्सी ड्रेपर आणि १७ महिन्यांची मुलगी स्कार्लेट वुगन यांची हत्या झाली होती.

न्यायालयाने सांगितले की, ही हत्या विचारपूर्वक आखणी करुन केली आहे. न्यायालयाने या प्रकरणी सांगितले की, जिथे आईने मुलींची काळजी घ्याची होती तिथे आईने त्यांची हत्या केली.

हत्यानंतर महिलेने आपल्या मुलीचे कपडे देखील फेसबूकवर विकण्याचा प्रयत्न केला होता. काळ्या पिशवीमध्ये कपडे ठेवून त्या महिलेने या पाकिटांचे फोटो काढून ते फेसबूकवर १२७० रुपयांना विकण्यास ठेवले होते. न्यायालयाच्या मते, आईने जानेवारी २०१८ ला मोठ्या मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली. तर १८ दिवसानंतर दुसऱ्या मुलीची देखील हत्या केली.

आरोग्यविषयक वृत्त