धक्कादायक ! महिला न्यायाधीश चक्क ‘चेंम्बर’मध्ये शारिरीक ‘संबंध’ ठेवत, वकिलांवर ‘दबाव’ देखील टाकत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एका महिला न्यायाधीशावर आरोप आहे की, ती चेंबरमधील वकीलांशी शारीरिक संबंध ठेवत असत. हे प्रकरण अमेरिकेतील केंटुकीमधील आहे. ती महिला न्यायाधीश आपल्या कर्मचार्‍यांना कामाच्या दरम्यान मद्यपान करण्यास परवानगी देखील देत होती. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, केंटुकी ज्यूडिशियल कंडक्ट कमिशनने फॅमिली कोर्टाची जज डॉन गेन्ट्री यांच्यावरील लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यात आली आहे. 38 वर्षांच्या गॅन्ट्रीवर एकूण 9 आरोप लावले गेल्याची माहिती मिळाली आहे.

गॅन्ट्री स्नॅपचॅटवर फ्लर्ट करत असत. यानंतर, त्यांच्यावर एकत्र झोपण्याचा दबाव आणत असत. कमिशनकडे तक्रार करणार्‍या लोकांनी सांगितले की, गॅन्ट्रीने कोर्टहाऊसला फनहाऊस बनविले होते. काही प्रकरणांच्या पॅनेलमध्ये गॅन्ट्री देखील सहभागी होती ज्यात मुलांवरील अत्याचाराच्या प्रकरणाबद्दल ऐकले गेले होते. गॅन्ट्रीचे पती म्हणाले की, महिला न्यायाधीशाचे तिच्या एका बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध होते. असे असूनही, गॅन्ट्रीने आपल्या बॉयफ्रेंडला कोर्टात नोकरी दिली होती.

सहयोगी न्यायाधीश कॅथरीन यांनी सांगितले की, आपल्या पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी ग्रॅन्टीने तिला स्नॅपचॅट डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याचबरोबर आपल्या पतीला एकत्र झोपण्यासाठी आग्रह देखील करण्यास सांगितले कारण घटस्फोटाच्या सुनावणीला तिला तिच्या पतीला विश्वासघातकी सिद्ध करायचे होते.

Visit : Policenama.com