Pune News : भरधाव वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार

कुरकुंभ : पोलीसनामा ऑनलाईन – अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी महिला जागीच ठार झाली. पुणे -सोलापूर महामार्गावर कुरकुंभ उड्डाण पुलाजवळ सोमवारी (दि.25) रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फुलोदेवी बिहारी मुखिया (वय 25 सद्या रा. कुरकुंभ ता. दौंड. मूळ रा. बिहार.) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत बिहारी मुखिया यांनी दौंड पोलिसात फिर्याद दिली आहे.

फुलोदेवी ही सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भिगवण येथे सासऱ्याकडे निघाली होती. त्यावेळी अज्ञात वाहनांने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक अमृता काटे, हवालदार एस. एम. शिंदे करत आहेत.