पार्किंगच्या वादातून महिलेचा खून

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव थांबवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे. मात्रा, अशात गुन्हेगारी घटना काही कमी झाल्या नाही. असेच एक प्रकरण नागपुरात घडले आहे. पार्किंगच्या वादातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना घडली आहे.

आरती गिरडकर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. एकनाथ टपरे असे आरोपीचे नाव आहे. आरती नंदनवन गल्ली नंबर 5 मध्ये राहत होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात पार्किंगचा वाद आहे. त्याच वादातून आरोपीने शस्त्राने वार करुन खून केला. घराजवळील पार्किंगमुळे आरती आणि एकनाथ यांच्या मोठा वाद झाला. याचा रागातून एकनाथ यांनी आरतीची हत्या केली. स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.