भुज-दादर एक्सप्रेसमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – भुज – दादर एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या डब्यात एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. दादर येथे महिलांच्या डब्याची तपासणी करत असताना आरपीएफ जवानांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आढळला आणि मोठी खळबळ उडाली.
दाडिया देवी चौधरी (वय ४०, रा. सुरत) असे या महिलेचे नाव असून ती वडाळ्यातल्या आपल्या बहिणीकडे जात होती. सूरत इथून ती ट्रेनमध्ये चढली होती. या महिलेच्या अंगावर अर्धेच कपडे होते. मारेकऱ्यांनी तिला मारल्यानंतर तिचा मृतदेह साडीने झाकून ठेवला होता. शुक्रवारी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान या महिलेचा गळा कापून हत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे प्रकरण चोरी आणि हत्येचे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. ही महिला दाडिया देवी शंकर चौधरी सूरतहून मुंबईसाठी रवाना झाली होती. महिला एका कपड्याच्या दुकानात काम करते. तिला २ मुली आणि एक मुलगा आहे.

भुज – दादर एक्सप्रेस सूरत नंतर थेट मुंबईच्या वसई, बोरीवली आणि नंतर दादरला थांबते. त्यामुळे या महिलेची हत्या वसई ते दादरच्या दरम्यान झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

कारण त्याच दरम्यान, रेल्वेतून काही महिला उतरताना दिसत आहे. जर त्या महिलांनी मृतदेह पाहिला तर त्यांनी याबद्दल पोलिसांना का नाही सांगितले. या सगळ्यामुळे पोलीस आता या दिशेनेही तपास करत आहेत. त्याचबरोबर इतर रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करीत आहेत.

दारू सोडवायला आले आणि जग सोडून गेले, आैषध पिल्यावर दोघा भावांचा मृत्यू