बॉयफ्रेन्डची हत्या करून वडिलांसोबत केलं लग्न !

पोलीसनामा ऑनलाईन : अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये वडिल आणि लहान बहिणीसोबत मिळवून बॉयफ्रेन्डची हत्या करणा-या एका महिलेला न्यायालयाने 40 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तिघांनी मिळून बॉयफ्रेन्डची हत्या केली आहे. दरम्यान बॉयफ्रेन्डच्या हत्येनंतर 3 आठवड्यांनी त्या महिलेने आणि तिच्या वडिलाने वर्जीनियामध्ये लग्न केले आहे.

थॉमस असे हत्या झालेल्या बॉयफ्रेन्डचे नाव आहे. अमांडा असे आरोपी महिलेचे नाव आहे. न्यायालयाने गेल्यावर्षी 31 ऑक्टोबरला या प्रकरणात अमांडाला 40 वर्षाची शिक्षा आणि वडील लॅरी मॅक्लूरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

डेली मेलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बॉयफ्रेन्ड थॉमसला मारण्याआधी तिघांनी त्याला ड्रग्स दिले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. तसेच मृतदेह दफन केला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अमांडा आणि तिचे वडील लॅरीने थॉमसला जीवे मारल्याच्या तीन आठवड्यानंतर वर्जीनियामध्ये लग्न केले. तपासातून समोर आले की, अमांडा आणि तिचा बॉयफ्रेन्ड थॉमस बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही इंडियाना स्टेटमध्ये राहत होते. एक दिवस त्यांची गाडी बिघडली. ज्यानंतर अमांडाचे वडील लॅरी आणि तिची बहीण अन्ना इंडियाना येथे आली आणि दोघांना वर्जीनियाला घेऊन गेले. लॅरीला म्हणजे अमांडाच्या वडिलाला अमांडासोबत लग्न करायचे होते. पण त्यात बॉयफ्रेन्ड आडकाठी ठरत असल्याने त्याची हत्या केल्याचे कारण समोर आले आहे.