संतापजनाक ! 20 वर्षे डांबून ठेवत केला ‘बलात्कार’, जन्मलेल्या 2 मुलींसोबत केलं ‘हे’

हेबेई (चिन) : वृत्तसंस्था – एका आजारी महिलेला 20 वर्षे डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर आरोपीने जन्मलेल्या दोन लहान मुलांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार चीन मधील हेबेई येथील काऊंटीमधील माफांजिंग खेड्यात घडला आहे. याप्रकरणी 70 वर्षाय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपीने एका आजारी महिलेला घरामध्ये डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच जन्मनलेल्या दोन मुलांची विक्री केली असल्याची माहिती असून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका वृत्तवाहीनीच्या वृत्तानुसार, डोंग या आरोपीने महिलेला एका शेतातून घरी घेऊन आला होता. तिला जबरदस्तीने पत्नी बनवून 20 वर्षे कोंडून ठेवले. तसेच बेदम मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला.

आरोपीच्या मारहाणीत महिला अपंग झाली. मात्र आरोपीने महिलेला लोकांनी बेदम मारहाण केल्यामुळे ती चालू शकत नसल्याचा दावा केला आहे. मात्र स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 1990 मध्ये आरोपीने महिलेला जबरदस्तीने घारामध्ये कोंडून ठेवले होते. आरोपीपासून महिलेने दोन मुलांना जन्म दिला होता. आरोपीने त्या दोन मुलांची विक्री केली. तसेच सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्याने त्या महिलेला कशापद्धतीने कोंडून ठेवले होते हे दिसून येते. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/