धक्कादायक ! घरातील कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यु

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – कुत्रा हा सर्वात प्रामाणिक आणि मालकावर जीवापाड प्रेम करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. अनेकजण कुत्र्याला घरातील सदस्याप्रमाणे पाळतात. मात्र अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक दुर्दैवी घटना घडली. येथे राहणाऱ्या एका महिलेवर तिच्याच कुत्र्याने घरातच हल्ला केला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. हे प्रकरण अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील संबंधित आहे. 67 वर्षीय महिलेला कुन्हाऊंड (coonhounds) जातीच्या तिच्याच पाळीव कुत्र्याने गंभीर जखमी केल्याची आणि यात त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Dog
स्वतःच्याच घरातील कुत्र्याच्या हल्ल्यानंतर आर्लीन रन्ना नावाची महिला घरातील फरशीवर बेशुद्ध पडली. त्यावेळी तिच्याशिवाय घरी कोणीच नव्हते. त्यामुळे वेळेवर उपचारही होऊ शकले नाहीत. सायंकाळी पती घरी परत आल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

रेनाचे पती जॉन टेलर यांनी फेसबुकवर या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या घरात दोन कुत्रे पाळलेले होते. यातील एका किंवा दोन्ही कुत्र्यांनी त्या महिलेवर हल्ला केला असावा परंतु घरी एकटी आणि असहाय असल्याने ती स्वतःला वाचवू शकली नाही.

कुत्र्यांसंदर्भात न्यायालय निर्णय घेणार :
या घटनेदरम्यान रेनाशिवाय इतर कोणीही घरात नसल्याने नेमकं काय झालं आणि घटना कशी घडली ते सांगू शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर दोन्ही कुत्र्यांना अ‍ॅनिमल शेल्टरमध्ये नेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमानुसार कुत्र्यांबाबत न्यायालय निर्णय घेईल.

21 वर्षांपासून रेनाशी विवाहबद्ध असलेल्या पती जॉनने यांनी तिचे कौतुक करत ती एक जबाबदार स्त्री म्हणून वर्णन केले. ते म्हणाले की रेन्नासारख्या महिलेची जागा कोणी घेऊ शकत नाही. ती नेहमी हृदयात राहील. तिच्या मृत्यूने मोठा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...
You might also like