नग्न अवस्थेत व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल करुन शिक्षिकेचा विनयभंग

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाईन – नग्न अवस्थेत व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करुन जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेचा विनभंग करण्यात आला. ही धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी व्हिडीओ कॉल करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ४३ वर्षीय महिला शिक्षिकेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून संबंधीत व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिका २ री व ३ रीच्या वर्गात बसल्या होत्या. तेव्हा त्यांना एका मोबाईल वरून व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल आला. त्यामुळे त्यांनी तो कॉलला उत्तर दिलं. तेव्हा संपूर्ण नग्न अवस्थेत असलेला एक व्यक्ती उभा असलेला त्यांना दिसला. तशा अवस्थेतच त्याने कॉल करून पीडित शिक्षिकेचा विनयभंग केला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Loading...
You might also like