मोठ्या दिरासोबत तिचे होते अनैतिक संबंध, पतीला संपवून तो कोरोनामुळे मेल्याचं सांगितलं पत्नीनं; 5 महिन्यानंतर ‘असा’ झाला पर्दाफाश

उदयपूर : वृत्त संस्था – राजस्थानच्या उदयपूरमध्ये पोलिसांनी एका मृत्यू प्रकरणाचे पितळ उघडे पाडले. एका महिलेचे तिच्या मोठ्या दीरासोबत अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची त्या महिलेने सुपारी देऊन हत्या केली. पण या प्रकाराबाबत कोणाला कळू नये, म्हणून तिने पतीचे कोरोनाचा संसर्ग झाल्याने निधन झाल्याचा बनाव केला.

जेठ से संबंध पति को मरवाया

उदयपूर शहरातील प्रतापनगर भागात हा प्रकार घडला. उत्तमदास या कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. त्याचा वार्षिक टर्नओव्हर 5 कोटी रुपये होता. उत्तमदास याची पत्नी रुपा आणि त्याचा मोठा भाऊ तपनदास याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या उत्तमदासला तपनदास आणि रुपा यांनी उदयपूर येथे पाठवले. त्यानंतर आरोपी राकेश आणि त्याच्या 4 साथीदारांना उत्तमदासच्या हत्येची साडे बारा लाख रुपयांची सुपारी दिली.

उत्तमदास उदयपूर येथे आल्यावर राकेश आणि त्याच्या साथीदारांनी दारू पार्टी केली. त्यानंतर उत्तमदासची गळा दाबून हत्या केली. त्याचा मृतदेह फेकून दिला. मात्र, जेव्हा पत्नी रूपा पतीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगत बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवू पाहत होती. तेव्हा पोलिसांना यावर संशय आला.

दरम्यान, हा प्रकार 5 महिन्यांनंतर समोर आला. तेव्हा उत्तमदासचा मृत्यू कोरोनामुळे नाही तर त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्तमदासची पत्नी रुपा, त्याचा मोठा भाऊ तपनदास आणि इतर पाच जणांना अटक केली.