पतीसोबत झोपल्यानं महिलेला झाली ‘ही’ एलर्जी, पोहचली मृत्यूच्या जवळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील एका महिलेला असा काही आजार झाला कि ती थेट मृत्यूच्या दाढेत पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,या महिलेला तिच्या पतीमुळे तिला भयंकर आजार झाला आहे. पतीबरोबर शरीरसंबंध ठेवल्यामुळे या महिलेला हि ऍलर्जी झाली आहे.

या महिलेच्या पतीला दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे या महिलेला हि ऍलर्जी झाली असून सुरुवातीला डॉक्टरांना हा साधारण आजार वाटला. या महिलेला ब्लड प्रेशरचा त्रास असल्याचे सुरुवातीला डॉक्टरांना वाटले. मात्र नंतर तिला anaphylactic shock हा आजार असल्याचे सांगण्यात आले. या महिलेच्या पतीला बैक्टेरियल इन्फेक्शनची औषधे दिली जात असतं. एक आठवडा शरीरसंबंधापासून दूर राहण्याचे या महिलेला सांगण्यात आले होते.

मात्र त्यानंतर पतीच्या सिमनच्या संपर्कात आल्याने या महिलेला हा आजार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र त्यांनी याची काळजी न घेतल्याने या महिलेला हा आजार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, याआधी देखील अशाप्रकारच्या दोन घटना समोर आल्या असून उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णाला औषधे देताना त्याच्या कुटुंबातील सदस्यांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.

Visit : Policenama.com