‘ते माझ्यावर अश्लील कमेंट करत, माझा फोन टॅप करायचे’ अशी सुसाईड नोट लिहून BHEL च्या आकऊंटंटची आत्महत्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – भारत सरकारच्या अंतर्गत येणारी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच भेल मधील एका महिला अकाउंटंटने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये तिने एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर तसेच सहा सहकाऱ्यांवर शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मृत महिलेच्या पतीने या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यांवर आपल्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पतीच्या जबाबानुसार पोलिसांनी या आधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळची राहणारी नेहा चोकसे हि हैदराबादमधील भेल मध्ये अकाउंट्समध्ये कार्यरत होती. तिने काल सकाळी साडेदहाच्या सुमारास बेडरूममध्ये बंद करून घेतले. खूप वेळानंतर देखील ती बाहेर न आल्याने तिच्या पतीने आवाज दिल्यानंतर देखील बाहेर न आल्याने त्याने दरवाजा तोडला असता ती फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या अधिकाऱ्यांनी तिचा मोबाईल हॅक करणे, तिचा शारीरिक छळ करणे तसेच आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप केला आहे.

फोन हॅक केला होता –

नेहाने आपल्या सुसाईड नोटमध्ये आरोप केला आहे कि, तिचा मोबाईल हॅक केला गेला होता. तसेच तिचे सर्व फोन टॅप केले जात असत. त्याचबरोबर या अधिकाऱ्याने तिच्यावर अश्लील टिप्पणी देखील केली होती.

भोपाळवरून करून घेतले होते ट्रान्स्फर –

लग्नानंतर तिने पतीसोबत राहण्यासाठी भोपाळवरून हैदराबादला ट्रान्स्फर करून घेतले होते. यावेळी कंपनीतील किशोर कुमार या अधिकाऱ्याने तिचा मोठ्या प्रमाणात छळ केला. तर एका कर्मचाऱ्याने तिचा फोन हॅक केला होता. या सुसाईड नोटमध्ये तिने किशोर कुमार याच्याबरोबरच मोहनलाल सोनी, तीरथभासी स्वेन, सीताराम पेंटाकोटा आणि महेश कुमार यांच्यावर आरोप केला आहे.

भोपाळमधील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश –
या सुसाईड नोटमध्ये तिने भोपाळमधील कर्मचाऱ्यांवर देखील आरोप केला असून यामध्ये कल्पना, स्वाति, नीलिमा, रूचिता आणि नेहा या महिलांवर देखील मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या