मासिक पाळीत वेदना होतात? आहाराचे हे पथ्य पाळा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महिलांना मासिक पाळीत ते चार दिवस खूप त्रासदायक वाटतात. मासिक पाळी येण्यापूर्वी आणि त्या दरम्यान अनेक त्रास सहन करावे लागतात. ज्या महिलांना मासिक पाळीत त्रास होतो, त्यांनी आपल्या आहारात बदल केला पाहिजे. आहाराकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कारण आहाराचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. योग्य आहार घेतल्यास मासिक पाळीतील त्रास कमी करता येऊ शकतो.

व्हिटॅमिन के हे रक्तस्राव आणि ब्लड क्लॉटिंगला नियंत्रित करते. अख्खे धान्य वाळवले किंवा प्रोसेस केले जात नाही त्यामुळे यातील पोषक तत्त्व टिकून राहतात. हे कार्बोहायड्रेट्स आहेत जे सेराटोनिन रिलीज करतात. सेराटोनिन हार्मोनमुळे मासिक पाळीत आराम जाणवतो. मासिक पाळीत भूक कमी होते. शरीरात आयर्नची पातळी कमी होते. म्हणून या दरम्यान दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या खाव्यात. पीरियड्स दरम्यान सॅलमन आणि टूना सारखे मासे खाल्ल्याने वेदनांपासून मुक्ती मिळते. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. मासिक पाळीत गोड खाण्याची इच्छा होते. अशा वेळी केक, किंवा मिठाई सारखे इतर काही गोड पदार्थ खाण्यापेक्षा गोड फळे खावीत. याकाळात ताण, चिडचिड घालवायची असेल तर मिंट किंवा आलं-मधाचा चहा पिणे लाभदायक असते. यामुळे महिलांना मानसिक शांती मिळते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/