6 महिन्यानंतर पत्नीनं एक ‘गोष्ट’ सांगितली तर पतीच्या डोळ्यात पाणीच आलं, पोलिसांकडे जावुन म्हणाला – ‘त्याला अटक करा’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – एका खाजगी रुग्णालयात आपल्या आजीला उपचारासाठी घेऊन आलेल्या तरुणीवर रुग्णालयातील एका कंपाउंडरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने तरूणीला नशीला पदार्थ देऊन हा कारनामा केला आहे.

अशा प्रकारे घडली घटना
पोलीस निरीक्षक राजवीर सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार फरिदाबादच्या राहणाऱ्या महिलेने आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, या महिला आपल्या आजीला घेऊन नोयडाच्या सेक्टर 27 मधील विनायक रुग्णालयात आली होती. यावेळी कंपाउंडर असलेल्या रजत मलिक ने आजीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर माझ्याही पाण्यात नशेच्या गोळ्या टाकल्या असल्याची धक्कादायक माहिती पंडितेने दिली आहे.

बलात्कारानंतर आरोपीने बनवला व्हिडीओ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातील एका खोलीमध्ये महिलेला नेऊन बलात्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ज्यावेळी पीडितेने पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले त्यावेळी आरोपीने पीडितेला मी तुझा व्हिडीओ काढला असून जर तू तक्रार दिलीस तर त्यावेळी काढलेला व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी दिली होती.

यानंतर महिला घाबरली आणि घरी निघून गेली त्यावेळी घाबरलेली असल्यामुळे महिलेने कोणालाच काही सांगितले नाही मात्र सहा महिन्यानंतर महिलेने न राहून याबाबत आपल्या पतीला सांगितले. हे ऐकताच पतीला खूप वाईट वाटले मात्र त्यानंतर लगेच तीला घेऊन पोलीस स्टेशनला गेले.

आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विरोधात सेक्टर 20 मधील पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि अधिक चौकशी सुरु आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like