‘पाकीट’ मारून महिला कमवते दरमहा 19 लाख रूपये, सांगितलं कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक २३ वर्षीय महिलेने अचंबित करणारा खुलासा केला आहे. आपण यूकेमध्ये पॉकेटमारी करून दरमहा जवळपास १९ लाख रुपये कमावत होते, असे या महिलेने सांगितले आहे. गेल्या एका वर्षात पॉकेटमारी करत तब्बल २.३ कोटींची चोरी केली असल्याचे या महिलेने सांगितले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महिलेला तिच्या घरच्यांनी ६२ लाख रुपायांत लग्नासाठी विकले होते.

मूळची बल्गेरियाची असणाऱ्या या महिलेची आश्यर्यचकित करणारी बाब म्हणजे चोरीपासून लाखो रुपये कमवूनही तिच्याकडे पैसे नाही. चोरी केलेले पैसे ती तिच्या पतीकडे देत असते, महिलेने सांगितले की तिच्या पालकांनी वयाच्या १४ व्या वर्षी तिला विकले होते. दोन मुलांची आई असणाऱ्या या महिलेने सांगितले की, तिला भीती वाटते की जर आपण पती आणि कुटूंबाचे ऐकले नाही तर ती मुलांपासून विभक्त होईल. ही महिला लंडनच्या घरात इतर आठ जणांसह राहते.

महिला म्हणाली कि, ज्यांच्या पैशाने मी चोरी केली आहे त्यांना मी सांगू इच्छितो की मी एक चांगली स्त्री आहे. मी जे करत आहे ते करू इच्छित नाही. तिला हे काम करायचे नाही, परंतु ते अशक्य आहे. ती म्हणाली की, तिला आपल्या समाजातील इतर मुलींना सावध करायचे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/