खळबळजनक ! प्रियकराच्या मदतीने ‘तिने’ मैत्रिणीचा खून करत रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव ; जाणून घ्या पुढे घडले ‘असे’ काही

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – विवाहितेने प्रियकराच्या मदतीने मैत्रिणीचा खून करून तिच्या अंगावर स्वत:चे कपडे, दागिने आणि चपला चढवून स्वत:च्याच मृत्यूचा कट रचल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

सोनाली शिंदे (वय २६) आणि तिचा प्रियकर छब्बादास वैष्णव अशी दोघांची नावे आहेत.

काय घडला होता प्रकार ?

काही दिवसांपुर्वी औरंगाबाद मध्ये एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. त्या मृतदेहाजवळ एक सुसाईडनोट सापडली होती. त्यात लिहीले होते. पती दारूडा आहे. तो सतत मारहाण करत असतो. मात्र पोलिसांनी तपास केल्यावर तो मृतदेह रुक्मीणी माळी या महिलेचा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर सोनाली आणि छब्बादासला अटक केली.

असा रंगवला स्वत:च्या मृत्यूचा बनाव

सोनाली आणि छब्बादास या दोघांचे प्रेमसंबंध होते. सोनाली प्रियकरासोबत पळून जाणार होती. परंतु पळून गेल्यानंतर आपला शोध कोणी घेऊ नये यासाठी तिने एक प्लान रचला. तिने प्रियकर छब्बादासच्या मदतीने आपल्यासाख्याच शरीरयष्टी असलेल्या मैत्रिणीचा खून करण्याचा प्लान आखला. दोघांनी मैत्रिण रुक्मीणी माळी हिला त्यादिवशी संपविले. त्यानंतर तिच्या अंगावर सोनालीने स्वत: चे कपडे, चप्पल, आणि दागिने चढविले. याप्रकऱणात पतीलाही अडकविण्याचा तिचा प्लान होता.

Loading...
You might also like